JH`H`DK1`
(संस्थापक)
शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य
शेवगाव च्या न्यु आर्ट्स,कॉमर्स अड सायन्स कॉलेज मध्ये विद्यार्थी असतांना आम्ही कथा,कविता लिहित,काही प्रसिद्ध होत तर काही परत येत.त्यावर उपाय म्हणून आपणच घडीपत्रिका स्वरुपात मासिक सुरु करावे असे वाटल्याने त्यावेळी भगवान राऊत,शहनाज सध्याची शर्मिला गोसावी,श्रीनिवास गोरे व मित्रांसह प्राचार्य शिवाजीराव देवढे,कविवर्य लहू कानडे,प्रा.सुधीर शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली घडीपत्रिका सुरु केली.या घडीपत्रिकेतील कवितेला साजेसे चित्र विजया पारेकर,दिलीप शहापूरकर काढत. पुढे शब्दगंध मासिक च्या वतीने काही चांगले दिवाळी अंक काढले.या प्रवासात प्रा.डॉ.शंकर चव्हाण,राजेंद्र उदागे,सतिश जाधव,चंद्रकांत पालवे,भारत गाडेकर,राजेंद्र फंड,सुभाष सोनवणे भेटले.त्यावेळी प्रा.सुधीर शर्मा यांनी शब्दगंध चळवळीची स्थापना करुन नोंदणीकृत करण्यासाठी प्रोत्साहन दिले अन् ‘ शब्दगंध साहित्यिक परिषद ’ सुरु झाली.
पहिल्या वर्षी व्ही.आर.डी.ई चे तत्कालीन सहसंचालक श्री.प्रमोदजी देशपांडे साहेब परिषदेचे अध्यक्ष झाले.लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात पहिले राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन डॉ.सुधाताई कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट गीतकार कविवर्य बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाले,त्यावेळी जाहीर अवाहन करुन सभासद वाढवले. जे सभासद झाले त्यांना संमेलनामध्ये गौरविण्यात आले.